सण आणि सर्जनशीलता
- Ketaki
- Sep 3, 2019
- 1 min read
Updated: Nov 30, 2022
सण म्हणजे नेमकं काय? धार्मिक विधी? चार लोकांनी एकत्र येऊन आनंदाने घालवलेले काही क्षण? छान छान कपडे आणि दागिने? मला वाटतं सण म्हणजे प्रत्येकाने आपल्यातली सर्जनशीलता - creativity - साजरी करणे. मनासारखी जमलेली आरास, एखादा सुरेख मोदक, एकसारखी पातळ कापसाची वात, वरणात अगदी बरोब्बर प्रमाणात पडलेलं हिंग-हळद, पितांबरी/रुपेरी/चिंच वापरून चमकदार केलेली पूजेची भांडी - काही ही असो - ते केल्यातून मिळणारा आनंद जेव्हा स्वतःच्या चेहऱ्यावर फक्त स्वतःकरता शाबासकी म्हणून स्मितहास्य घेऊन येतो तेव्हा मनोमनी सण साजरा होतो. सगळे मिळून आपली स्वतःची वैयक्तिक सर्जनशीलता एकत्र साजरी करतात तेव्हा सण खरंच आनंदाचा होतो.

पूर्ण विचार आणि प्लॅनिंग करून शाडूच्या मातीची मूर्ती हाताने बनवून रंगवणारी गुंजन सहस्रबुद्धे आणि ऑफिस मध्ये बसल्या बसल्या प्ले-डो घेऊन हातातल्या हातात आपल्या मनातला गणपती बाप्पा साकारणारी अपूर्वा साठे, ह्या माझ्या दोन बहिणींना एक प्रश्न - आपल्या स्वतःच्या हाताने बाप्पा साकारण्यातला आनंद नेमका कसा असतो?




Comments