अंधार
- Ketaki
- Apr 5, 2021
- 1 min read

का वाटते अंधाराची भीती? दिसत नाही म्हणून?
दिवसाउजेडी केलेल्या कृत्यांचा पाप पुण्याचा हिशोब ठेवतात म्हणतात. कुणाला असतो हो इतका वेळ? ही असंख्य काळी पांढरी माणसं आणि त्यांची कर्म, कुणाच्या वहीत असते इतकी जागा?
पाप पुण्याचा हिशोब रोजचा रोज संपत असतो. मन असतं ना आपलंच! झोप लागली तर अंधार दिसतोच कुठे? पण नाही लागली तर...
का वाटते अंधाराची भीती? दिसत नाही म्हणून? का सगळं स्वच्छ दिसतं म्हणून?




Comments