राखी - स्वतःची, स्वतःकरता
- Ketaki
- Aug 22, 2021
- 1 min read

साथ, सोबत, मैत्री, प्रेम, विश्वास किती अपेक्षा त्या एका धाग्याकडून असेल जर तो धागा खरा सामर्थ्यवान एकदा पहावा स्वतःलाच बांधून
मैत्री करावी स्वतःशीच, आपसूक असे खात्री साथीची प्रेम करावे या सोबत्यावर आणि जोड द्यावी आत्मविश्वासाची
आपल्याच लढाया आणि आपलीच संकटं यावे का कोणी दुसर्याने धावून? असेल जर तो धागा खरा सामर्थ्यवान एकदा पहावा स्वतःलाच बांधून




Comments