सूर
- Ketaki
- Sep 24, 2022
- 1 min read

सूर फार चोखंदळ असतात उगीच कुणाला स्पर्श करत नाहीत
ज्याला सुराने स्पर्श केला कलाकार फक्त तोच ठरतो
आपल्यातला सूर ओळखून, वाढवून आपल्या कलेचा वृक्ष करतो
मग विसर पडतो त्यालाच, आपण कलाकार कसे याचा अन् "कले"पेक्षा "कार" मोठा व्हायला लागतो
फांद्यांचा अवास्तव भार कुठल्या मुळांना झेपतो? आणि मुळे एकदा तुटली की कुठला वृक्ष जगतो?
त्या वाकड्या तिकड्या वाढलेल्या अस्ताव्यस्त फांद्या जमिनीत रुतायचा प्रयत्न करत राहतात
काही थकतात, काही रुततात, काही जगतात आणि काही तितकेच बळकट वृक्ष होतात
काही मात्र...
फांद्या वाढवायच्या नादात वृक्ष त्यांना सांगायलाच विसरतो सूर आहे म्हणून तो असतो; तो आहे म्हणून सूर नसतो




Comments