चुक-चुक
- Ketaki
- Jan 23, 2021
- 1 min read

दबक्या पावलाने घरात घुसली घर बघून म्हणाली, राहीन इथंच मी आपली
बागडायला आहे इथं जागा बरीच, लपाछुपी खेळेन, धमाल येईल खरीच
येता जाता खायला ही भरपूर मिळेल, राहीन इवल्याशा जागेत,
कुठं कुणाला काही कळेल?
घराला देईन घरपण, सर्वत्र ठेवेन लक्ष
अंधारातल्या शत्रूलाही सहज करेन भक्ष्य
वसली ती तिथंच, स्थिरावली मस्त जीभ तेव्हढी चपळ, शरीर अन डोळे सुस्त
एक दिवस सोडलान पुरावा पांढरा-काळा बेगॉन, झाडू सरसावले घालण्या तिला आळा
मग एकदा पेंगता पेंगता लपायलाच विसरली जीव धरला मुठीत, पण शेपूट तेव्हढी सोडली
झाडू आला मागं, अन बेगॉनचा फवारा व्हिसा संपलाय बाई तुमचा, आता संसार आवरा




Comments