उरलेल्या भाज्यांचे कटलेट
- Ketaki
- May 21, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
...हे सगळे प्रकार चविष्ट तर लागतातच परंतु healthy-unhealthy च्या स्पेक्ट्रम वर कुठेही आणून सहज बसवताही येतात.

फ्रिज मध्ये थोड्या थोड्या उरलेल्या भाज्या हे एक मनोरंजक जिगसॉ पझल असतं. आज सकाळी फ्रिज उघडला तर थोडा कॉलिफ्लॉवर, थोडी फरसबी, अर्धं गाजर, थोडीशी कोथिंबीर, १-२ कांद्याच्या पाती आणि अर्धा उकडलेला बटाटा माझ्याकडे आशेने बघत होते. ताजी भाजी आणायला जाण्याआधी उरलेल्या भाज्या संपवायच्या असा एक नियम घालून घेतला आहे मी. आजचा ब्रेकफास्ट हा या उरलेल्या भाज्यांना समर्पित होता.
फळभाज्या किंचित वाफवून घेतल्या. थोड्याशा उकळत्या पाण्यात जेमतेम भिजेल इतपत रवा घालून तो वाफवून मळून घेतला. मग भाज्या, रवा, मीठ, आलं, मिरची, कोथिंबीर आणि कांद्याची पात मिसळून त्याचे लहान लहान बॉल्स करून थोड्या तेलावर परतले. थोडी मोडाची कडधान्यही उरली असती तर बरं झालं असतं असं वाटलं.
आपल्याकडले टिक्की/कबाब/कटलेट, आणि पश्चिमेकडले क्रोकेट (croquette) हे सगळे नातलग. भाज्या/चीज/मांस/मसाले यांच्या मिश्रणाला "salpicon" असं नावही आहे. Salpicon हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा साधारण अर्थ "विविध खाद्यपदार्थांचे केलेले मिश्रण" असा होतो. हे मिश्रण रवा/मैदा/बेसन/बटाटा binder म्हणून वापरून घट्ट बांधून, वरून ब्रेड क्रम्ब्स लावून किंवा सरळ ब्रेडच्या आत भरून तळतात किंवा बेक करतात. हे सगळे प्रकार चविष्ट तर लागतातच परंतु healthy-unhealthy च्या स्पेक्ट्रम वर कुठेही आणून सहज बसवताही येतात. त्याचमुळे पौष्टिक अन्नापासून पार्टी स्टार्टर पर्यंत यातून काहीही करता येतं.




Comments