साबुदाणा वडे
- Ketaki
- Jul 12, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
तळण्याचे एक तंत्र मी मुंबईला आमच्याकडे पोळ्या करायला येणाऱ्या मावशींकडून शिकले होते. एक तर तेल पुरेसे गरम असावे आणि दुसरे म्हणजे पदार्थ पूर्ण बुडु शकेल एवढे तेल हवेच

१० मे चा दिवस - रविवार आणि संकष्टी चतुर्थी. आम्ही उपास करत नाही पण आम्हाला उपासाचे पदार्थ मात्र आवडतात. मी साबुदाण्याची खिचडी बऱ्याच वेळा करते पण वडे मात्र तळणे टाळावे म्हणून सहसा नाही करत. पण उपक्रमानिमित्त वडे करायचे ठरवले.
मला साबुदाणा वडे करायचा फारसा अनुभव नव्हता आणि करताना चूक झालीच. साबुदाण्यात जास्त पाणी झालं, उकडलेला बटाटा कमी पडला आणि वडा काही वळला जाईना! आमचा उपास नसला तरी उपासाच्या पदार्थात उपासाला चालणाराच पदार्थ घालायला हवा! सुदैवाने घरात थोडेसे राजगिऱ्याचे पीठ होते! ते वड्याच्या मिश्रणात घातले आणि वडे झाले!
तळण्याचे एक तंत्र मी मुंबईला आमच्याकडे पोळ्या करायला येणाऱ्या मावशींकडून शिकले होते. एक तर तेल पुरेसे गरम असावे आणि दुसरे म्हणजे पदार्थ पूर्ण बुडु शकेल एव्हढे तेल हवेच. एकदा गरम केलेले तेल परत तळणीकरता वापरल्यास हानिकारक असते म्हणून काम झाल्यावर ते तेल फेकून द्यावे लागते. तेल वाया जाऊ नये म्हणून मी बऱ्याच वेळा कमी तेलात तळण करायचा प्रयत्न करायचे. पण त्यामुळे पदार्थ तेलकट व्हायचा. मावशींकडून शिकले की कढईत तेल पुरेसे असले की पदार्थाचे वरचे आवरण पटकन कडक होते आणि पदार्थ तेल न शोषता आतून वाफेवर व्यवस्थित शिजतो.
एकदा तळणाकरता वापरलेलं तेल परत स्वयंपाकात न वापरता फेकून द्यावं लागतं. सिंक मध्ये ओतलं तर पाईप चोक होतो म्हणून ते प्लास्टिकच्या पिशवीत किंवा दुधाच्या वापरलेल्या टेट्रापॅक मध्ये घालून कचऱ्यात फेकावं असं म्हणतात. या व्यतिरिक्त या तेलाचा वेगळा काही वापर करणं शक्य असतं का? कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये लिहा.
Comments