उसळ आणि पाव
- Ketaki
- Jun 4, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
उसळ आणि पाव हा कष्टकरी कामगारांसाठी सुयोग्य परिपूर्ण आहार आणि महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध पदार्थ.

आजचा मेनू - उसळ आणि पाव! १ मे ची लेबर डे ची सुट्टी आणि महाराष्ट्र दिनही! उसळ आणि पाव हा कष्टकरी कामगारांसाठी सुयोग्य परिपूर्ण आहार आणि महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध पदार्थ.
पांढरे वाटाणे आणि सोयाबीन यांची कांदा आणि खोबरं घालून सौम्य उसळ केली आणि कणकेचे पाव घरीच केले. आदल्यादिवशी रात्री वाटाणे आणि सोयाबीन भिजवले, आणि कणिक ड्राय यीस्ट घालून मळून, झाकून, फुगण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवून दिली. सकाळी प्रेशर कुकर मध्ये उसळ केली आणि त्याबरोबर ओव्हन मध्ये पाव भाजायला ठेवले.
उसळ कुठल्याही कडधान्याची होतेच. मी मुद्दाम प्रत्येकवेळी वेगवेगळी कडधान्य वापरते. कणकेचे पाव मैद्याच्या पावइतके मऊ होत नाहीत. परंतु आमच्या इथे लादीपाव सहज मिळत नाहीत आणि जर घरीच करायचे असतील तर मैदा टाळावा म्हणून मी कणकेचे करते.
आजचा दिवस माझ्या उपक्रमाचा सातवा दिवस होता. सलग सात दिवस ठरवल्याप्रमाणे सकाळी वेगवेगळे पदार्थ करता आले म्हणून स्वतःला एक लहानशी शाबासकी दिली!
Comments