top of page

वाटली डाळ

  • Ketaki
  • Jun 18, 2020
  • 1 min read

Updated: Oct 8, 2022

ब्रेकफास्ट, लन्च आणि डिनर या व्यतिरिक्त आपल्या संस्कृतीत एक "मधली" वेळ नावाची गमतीशीर आणि अतिशय समृद्ध कॅटेगरी आहे.


ree

आज केली वाटली डाळ. लहानपणी वाटली डाळ ही साधारणपणे जेवणात किंवा मधल्या वेळीच खायला केलेली आठवते.


ब्रेकफास्ट, लन्च आणि डिनर या व्यतिरिक्त आपल्या संस्कृतीत एक "मधली" वेळ नावाची गमतीशीर आणि अतिशय समृद्ध कॅटेगरी आहे. त्या वेळेला नकळत हात फ्रिज किंवा वेगवेगळे डबे उघडून बघायला लागतात. आमच्या लहानपणी त्या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, बेसनाचे लाडू, चुरमुरे, पोह्याचा चिवडा, भिजवलेले चणाडाळ-शेंगदाणे असे प्रकार मिळायचे. थोडं नंतर त्या डब्यांमधून दुकानातून आणलेलं फरसाण या कॅटेगरीतले वेगवेगळे पदार्थ मिळायला लागले. यातले बरेच पदार्थ चणाडाळीपासून बनवलेले असायचे. वाटली डाळ आणि कैरीची डाळ हे प्रकार पण मधल्यावेळच्या सणसणीत भुकेसाठी योग्य असायचे.


चणाडाळीपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये "चना जोर गरम" हा एक खास पदार्थ खूप आठवतो. अलीकडे बऱ्याच वर्षात खाल्ला नाही. अखंड चणे भिजवून, मग शिजवून, एक एक करून चेपले जातात. मग ते वाळवून भाजले किंवा तळले जातात. त्यावर मीठ आणि मसाला घालून ते चविष्ट होतात. या पदार्थाचं उगमस्थान कुठे मला माहिती नाही परंतु हा पदार्थ खूपच जुना असावा. याचा दाखला म्हणजे हिंदी सिनेमातली गाणी!


१९४० मधल्या "बंधन" नावाच्या सिनेमात एक गाणं होतं "चने जोर गरम बाबू मैं लाया मजेदार, चने जोर गरम" १९५६ मधल्या "नया अंदाज" या सिनेमात किशोर कुमार अणि शमशाद बेगम यांनी गायलेलं एक गाणं होतं. मीना कुमारी चना जोर गरम विकत असते आणि किशोर कुमार शेंगदाणे. त्यांची एकमेकांबरोबर स्पर्धा असं हे गाणं आहे आणि त्याचे शब्द ही गमतीशीर आहेत.


शमशाद बेगम: चना जोर गरम बाबू मैं लाया मजेदार किशोर कुमार: मूंगफली गर्रम गर्रम मैं लाया मजेदार


पारंपरिक पदार्थ करताना विचारांना धावायला मोकळं मैदान दिलं की कितीतरी गोष्टी आठवतात. संस्कृतीचा हा महत्वाचा भाग हरवू न देणे ही जवाबदारी वाटते.

Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page